विजय सोबतच्या नात्यावर तमन्ना बोलली, ‘आम्ही एकत्रपणे…’
![विजय सोबतच्या नात्यावर तमन्ना बोलली, 'आम्ही एकत्रपणे…' Balasaheb Thackeray 21](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/Balasaheb-Thackeray-21-780x470.jpg)
Tamannaah Bhatia tollywood actress finally reaction : टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटीया ही गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचं नाव प्रख्यात अभिनेता विजय वर्मा सोबत जोडलं जाणं हे आहे. विजय सोबतच्या नात्यावर आता तमन्नानं प्रतिक्रिया दिली आहे. चाहत्यांना तमन्नाचे काय म्हणणे आहे हे जाणून घ्यायचे होते.
बऱ्याच दिवसांपासून तमन्ना आणि विजयचे फोटो व्हायरल झाल्याचे दिसून आले होते. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही चर्चेत आल्या होत्या. यासगळ्यात विजय आणि तमन्नाच्या फोटोंनी चाहत्यांना चर्चेस कारण दिलं होतं.त्यामुळे मोठ्या प्रमाणात नको त्या चर्चांना उधाणही आले होते. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम देण्याचे काम तमन्नानं केलं आहे. तिची आपल्या नात्यावरील प्रतिक्रिया समोर आली आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन असो की विमानतळावरील त्या दोघांचे फोटो हे गेल्या काही दिवसांपासून बातमीचा विषय झाले आहेत.
आपल्या नात्यावर विजय आणि तमन्ना यांनी चुप्पी साधली आहे. नेटकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आणि वेगवेगळया प्रतिक्रिया आल्यानंतर अभिनेत्रीनं शेवटी आपले म्हणणे नेटकऱ्यांना सांगितले आहे. ती म्हणते, कोण काय म्हणते याकडे मी लक्ष देत नाही. अशा अफवा पसरत असतातच. त्या प्रत्येकावर मी काही बोलू शकत नाही. मी काही नेटकऱ्यांच्या अफवांवर प्रतिक्रिया देण्यास बांधील नाही. अशी प्रतिक्रिया तमन्नानं दिली आहे.
लोकं दर आठवडयाला आमचे लग्न लावून देतात. मला माहिती नाही लोकं अशी का वागतात, आम्हाला कळतं की आमचे लग्न झाले आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यावरुन यायला लागतात. आता तुम्हीच सांगा यावर काय बोलायचं, मलाच आता असे वाटायला लागले आहे की, आमचे लग्न झाले आहे. अजुन लग्न झालंही नाही तोच अशा प्रतिक्रिया आहे. विचार करा जेव्हा मी लग्न करेल तेव्हा तर लोकं काय बोलतील याचा विचार न केलेला बरा. असेही तमन्नानं यावेळी सांगितले.