सतेज पाटील यांनी केला असा सवाल; ज्यामुळे भाजप सापडले चांगलेचं कोंडीत
![सतेज पाटील यांनी केला असा सवाल; ज्यामुळे भाजप सापडले चांगलेचं कोंडीत satej patil emage](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/satej-patil-emage.jpg)
कोल्हापूर : मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला तर भाजपचा दारुन पराभव झाला. या निवडणुकीवर भाष्य करताना काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपला चांगलाच कोंडीत टाकणारा सवाल केला. भाजपच्या मतांचा टक्का वाढला असं त्यांच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. मग भाजपनं आता जाहीर करावं की, त्यांना रिपाइंची, जनसुराज्यची, सदाभाऊंच्या रयत पक्षाची, गोपिचंद पडळकरांच्या सामाजाची, शिवसंग्रामची, आवाडे गट, महाडिक गट यांची मतं मिळाली नाहीत. मला वाटतं भाजपची गेल्या पाच वर्षात सुरु असलेली अशस्वीतेची घौडदौड थांबवण्यासाठी त्यांनी ही निकराची लढाई लढली. कोल्हापूर शहर पुरोगामी आहे हे दाखवून देण्याचं काम इथल्या नागरिकांनी केलंय. त्यामुळे भाजपला कोल्हापुरच्या जनतेने सपसेल नाकारले आहे. हे त्यांनी सतत होणाऱ्या पराभवा शिकले पाहिजे. आणि झालेला मान्य पराभव करुन तो स्विकारला पाहिजे असे पाटिल म्हणाले.
कालच्या निकालातील मतांच्या आकडेवारीत आघाडीतील तीन पक्ष एकत्र असतानाही भाजपच्या मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आणि याउलट आघाडीचे हे प्रमाण कमी झाले आहे असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. तर आघाडीकडुन असे सांगण्यात येते की, कोल्हापुरात भाजपने मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण केले होते. कश्मीर फाईल्स चित्रपटाची ३५ ते ३० हजार तिकीटं मोफत वाटण्यात आली. पण हा चित्रपट बघायला जाताना ११६ रुपयांचं पेट्रोल टाकावं लागतं. तसेच घरी आल्यावर १,१०० रुपयांच्या सिलेंडरवर चहा तयार करुन प्यावा लागतो हे आम्ही जनतेला पटवून दिलं. महागाईचा मुद्दाही आम्ही लोकांसमोर मांडला यामुळेे भाजपचा पराभव झाला असे सतेज पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे.