ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘लव जिहाद’च्या नावाखाली समाजात विष पेरुन, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; अजित पवारांचा हल्लाबोल

सांगली : (Ajit Pawar on Love Jihad) लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम सुरू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे, मात्र आज जे समाजात सुरू आहे त्याविरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे होता, तसा तो होताना दिसत नसल्याची खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit Pawar on Love Jihad) व्यक्त केली.

सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथील क्रांतीवीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकासाठी दोन विधानपरिषद सदस्यांच्या निधीतून एकूण 22 लाख आणि सीएसआरमधून 5 लाख निधी देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केलं. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या आमदार निधीतून 11 लाख, आमदार जयंत पाटील, सातारचे शशिकांत शिंदे यांच्या आमदार निधीतून 11 लाख रुपये आणि सीएसआरमधून 5 लाख रुपये जाहीर असे एकूण 27 लाख जाहीर करण्यात आले.

अजित पवार म्हणाले, क्रांती वीरांगणा इंदूमती पाटणकर यांनी स्वातंत्रलढ्याबरोबर जाती अंताचा लढा उभा केला. त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले. आता सुद्धा याच भूमीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अलीकडे सेक्युलर या शब्दाला (Ajit Pawar on Love Jihad) कुठं तरी तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे आपल्या भारताच्या दृष्टीने अतिशय अडचणीचं होणार आहे.”

दरम्यान पवार पुढे म्हणाले की, प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा. कुणाच्याही धर्माने एखाद्या धर्माबद्दल आकस बाळगावा असं सांगितलेलं नाही. आपल्या धर्माची प्रार्थना आपापल्या धर्म मंदिरात करावी, घरात करावी. मात्र, बाहेर वावरताना प्रत्येकानं नागरिक या नात्याने वावरावं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये