डिझेल वाहनांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याच्या मागणीवर नितीन गडकरींचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : (10% GST On Diesel Cars) सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या 63 व्या परिषदेत नितीन गडकरी म्हणाले होते की, डिझेल वाहनांवर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी लावला पाहिजे. मी अर्थ मंत्रालयाकडे याची मागणी करणार आहे अन् यासंबंधीचा मसुदा तयार करण्यात आहे. गडकरींच्या या वक्तव्यानंतर औद्योगिक आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्ममध्ये मोठी घसरण झाली.
दरम्यान, आता रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, सध्या अतिरिक्त जीएसटी लागू करण्याची कोणतीही योजना नाही. आता तसा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.
2070 पर्यंत कार्बन निव्वळ शून्य गाठण्यासाठी आणि डिझेलसारख्या हानिकारक इंधनामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच ऑटोमोबाईल विक्रीत वेगाने वाढ करण्याच्या आमच्या योजनेनुसार स्वच्छ आणि पर्यायी इंधनांचा वापर करणे महत्त्वाचे आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.