Top 5ताज्या बातम्यामनोरंजन

‘३ फुट नवरदेव – ३ फुट नवरी’; मिनी कपलचे लग्न चर्चेत

जोधपुर : Jodhpur Mini Couple Marriage : सध्या लगीनसराई सुरु आहे. जिकडे – तिकडे तरुण तरुणी लग्नबंधनात गुंतताना दिसत आहेत. अशातच राजस्थानमधील जोधपूरचे एक लग्न देशभरात चर्चेत आहे. जोधपुर मधील या लग्नाची खासियत म्हणजे यातील नवरदेव आणि नवरी दोघेही उंचीने खूप लहान आहेत. दोघांचीही उंची तीन तीन फुट आहे. त्यामुळेच हे लग्न चर्चेचा विषय बनले आहे. Jodhpur Mini Couple Marriage

या दोघांची उंची सुमारे ३ फूट ७ इंच आहे. नवरी साक्षी (Sakshi) बीकॉम आणि एमबीए केल्यानंतर दहावीच्या मुलांना शिकवत आहे. तर, नवरदेव ऋषभ (Rushabh) स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. २६ जानेवारीला हे दोघे लग्न बंधनात अडकले. साक्षी आणि ऋषभ यांची मागच्या वर्षी साखरपुडा पार पडला. त्यांनतर त्यांची चांगली ओळख झाली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर मिनी कपल नावाची एक आईडी बनवून त्यावर पोस्ट शेअर करत लोकप्रियता देखील मिळवली. तेव्हापासुन हे कपल लोकांच्या चांगलच परिचयाचं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये