क्राईमताज्या बातम्या

पुण्यातील भीमा नदी पत्रात चार मृतदेह आढळल्याने शहर हादरले

पुणे | पुण्यातील (Pune) भीमा नदीपत्रात पाच दिवसांत चार मृतदेह आढळून आल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. दोन पुरुष आणि दोन महिलांचे मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना मृतदेह आढळून आले आहेत. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून अधिकचा शोध घेतला गेला असतांना एकूण चार मृतदेह हाती लागले आहे. यामध्ये एनडीआरएफच्या माध्यमातून अधिकचा शोध घेतला जाणार आहे, यामध्ये मुलांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

ही सामूहिक आत्महत्या असल्याचे तर्क लावले जात आहेत. आता याबाबत पोलीसांच्या तपासात काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तीन मृतदेह देहांचे शवविच्छेदन झाले असून त्याच्या अहवालामध्ये काय समोर येतं यावर पुढील तपास अवलंबून आहे. पुणे ग्रामीण पोलीसांच्या माध्यमातून अधिकचा तपास केला जात असला तरी मृतदेहांची अद्यापही ओळख पटत नाहीये, त्यामुळे तपासाला दिशा मिळत नाहीये.

एकाच कुटुंबातील हे मृतदेह असण्याची शक्यता असल्याने आणखी मृतदेह तर नदीत नाही ना यासाठी शोधकार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू आहे. मच्छीमारांना सुरुवातीला एका स्रीचा मृतदेह आढळून आला होता, त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एका स्रीचा मृतदेह आढळून आला. तर दुसऱ्या दिवशी दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आला आहे. नदीपात्रात मृतदेह सापडल्याने दोन पथके तपासासाठी रवाना झाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस (Pune Police) दलाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाचे आदेश दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये