मोदी-पवार यांच्या भेटीवर अजित पवार म्हणाले…
![मोदी-पवार यांच्या भेटीवर अजित पवार म्हणाले... ajit pawar 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/ajit-pawar-1.jpg)
शिर्डी : आज पंतप्रधान कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केल्यानंतर राज्य विरुद्ध केंद्र संघर्ष आणखी शिगेला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तसंच या भेटीसंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी शिर्डी परिसरात आहे. त्यामुळे जोपर्यंत माहिती घेत नाही, तोपर्यंत बोलणं उचित नाही, पण देशाचे पंतप्रधान आणि एका पक्षाचे राष्ट्रीय नेते विकासकामांबाबत भेटू शकतात. काही महत्त्वाचे प्रश्न असतात त्यात चर्चा करावी लागते, तसे काही प्रश्न असू शकतात. दोन्ही मोठे नेते आहेत. त्यांच्यात काय विषय झाला मला माहित नाही.” असं अजित पवार म्हणाले.