‘…ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, त्यांचे वारसदार नाहीत’; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंवर निशाणा
!['...ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, त्यांचे वारसदार नाहीत'; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंवर निशाणा ramdas athwale and raj thackreay](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/ramdas-athwale-and-raj-thackreay-681x470.jpg)
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याला आयोजीत मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन राज्यातल्या विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच संदर्भात आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनीही भाष्य केलं आहे.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, ”कोणाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायचा असेल तर हरकत नाही. काही मंदिरांवर लाऊडस्पीकर आहेत. त्यामुळे मशिदीवर जे त्यांचे परंपरागत लाऊडस्पीकर लावलेले आहेत. ते लावतायत म्हणून आम्ही लावू अशी भूमिका घेणं योग्य नाही. पूर्वीपासून ज्या ठिकाणी भोंगे आहेत, तिथे आहेत, मंदिरांवरही लाऊडस्पीकर असल्याचं आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे विरोधाला विरोध करण्याची भूमिका योग्य नाही. राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, पण ते त्यांचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार असूनही आमच्यासोबत येत नाहीत, याचा आम्हाला खेद आहे.