‘…राऊतांनी माझ्यावरील कारवाईसाठी पुढाकार घेऊन गृहमंत्र्यांवर दबाव आणला’- प्रविण दरेकर
!['...राऊतांनी माझ्यावरील कारवाईसाठी पुढाकार घेऊन गृहमंत्र्यांवर दबाव आणला'- प्रविण दरेकर pravin darekar and sanjay raut](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/pravin-darekar-and-sanjay-raut.jpg)
मुंबई : आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मजुर प्रकरणी दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. यादरम्यान, प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारच्या दबावाखाली हे षडयंत्र रचलं होत. खासदार संजय राऊत यांनी या कारवाईसाठी पुढाकार घेऊन गृहमंत्र्यांवर दबाव आणला, अशी खोचक टीका त्यांनी महाविकास आघाडी सरकावर केली आहे.
किरीट सोमय्या पोलिसांच्या चौकशीला सामोरे का जात नाहीत, यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, पोलिसांच्या दबावाखाली हे काम सुरू आहे. सोमय्या हे धाडसी नेते आहेत. त्यांनी अनेक घोटाळे समोर आणले आहेत. मात्र ते सरकार विरुद्ध बोलल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीकडून माझ्यावरही कारवाईचा ससेमिरा लावला, परंतु हा दबाव न्यायालयाने फेटाळून लावला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.