गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; २९ एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी
![गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; २९ एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी anil deshmukh](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/anil-deshmukh.jpg)
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. न्यायालयाने अनिल देशमुखांसह सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने देशमुखांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत देशमुखांसह इतरांना 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
न्यायालयाने अनिल देशमुख, कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे तसेच मुंबई पोलीस सचिन वाझे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांची चौकशी करण्यात येत आहे. अनिल देशमुखांना 100 कोटी वसुलीच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सीबीआय कोर्टाच्या निर्णयानंतर अनिल देशमुखांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत.