‘भाजपा काहीही…’; जेम्स लेनच्या खुलाशानंतर पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : सध्या राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध मनसे असा संघर्ष सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आधी मशिदींवरील भोंगा आणि हनुमान चालीसा यावरुन वाद सुरू असतानाच आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरुनही मोठा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे राज ठाकरेंनी पुरंदरेंमुळे घराघरात छत्रपती शिवाजी महाराज पोहचल्याचे सांगताना दुसरीकडे शरद पवारांनी मात्र पुरंदरेंनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. यावरुन जेम्स लेनने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुरंदरेंसोबत आपलं बोलणं झालं नसल्याचा दावा केला आहे. यानंतर भाजपाकडून शरद पवारांवर कारवाईची मागणी होत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाने शरद पवारांवर कारवाई करण्याची मागणी केल्यासंबंधी बोलताना संजय राऊत म्हणाले, “भाजपा काहीही म्हणू शकतो. त्यांच्या म्हणण्यावर राज्य चाललेलं नाही. कायद्याचं राज्य आहे आणि त्यानुसारच चालेल”.