… तर नक्की असू शकतो ’क’ जीवनसत्वाचा अभाव!
हिरड्या सुजणे, नाजूक होणे, त्यातून रक्त येणे, त्वचेतून रक्त येणे, रक्तक्षय होणे, जखमा भरायला वेळ लागणे , थायरॉईड ग्रंथीचे काम मंदावणे, रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे. वारंवार थकवा, भूक मंदावणे, स्नायूंमध्ये वेदना, शारीरिक व मानसिक ताणामुळे क जीवनसत्व कमी झाल्याने जखमेतून अतिरिक्त रक्तस्त्राव होऊ शकतो. ही सगळी ’क’ जीवनसत्व कमी असल्याची लक्षणे आहेत.
ज्या पेशंटसमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते त्यांच्या आहारात ’क’ जीवनसत्वाचा अभाव जाणवतो,अशा पेशंट्सना ’क’ जीवनसत्त्व पाचपट दिल्यावर रक्तवाहिन्यांचा येतो, पित्ताशयामध्ये पित्तरसाची वाढ, आणि मलाद्वारे मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल बाहेर पडू लागते. मोठ्या प्रमाणात ’क’ जीवनसत्व दिले तर उच्च रक्तदाब व वाढलेले कोलेस्टेरॉल हळूहळू खाली येते. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये शारीरिक व मानसिक ताण खूप असतो. त्यामुळे जीवनसत्त्वाची गरज वाढते. रक्ताचा कॅन्सर झालेल्या लहान मुलांमध्ये हिरड्यातून जखमांमधून रक्तस्राव सुरू होतो. क जीवनसत्व दिल्यानंतर ही लक्षणे जातातच परंतु कॅन्सरची वाढसुद्धा कमी होते.
मूत्रपिंडविकार : मूत्रपिंडविकारामध्ये शारीरिक व मानसिक ताणामुळे, औषध उपचारांमुळे आणि मूत्रावाटे जीवनसत्व जास्त प्रमाणात गेल्याने या जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होतो त्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो याचा अभाव थोड्या प्रमाणात असला तरी सुद्धा लघवीतून रक्त येते. ’क’ जीवनसत्त्वयुक्त आहार व औषधे दिल्यास लगेच लघवीतून होणारा रक्तस्त्राव थांबतो मात्र हा डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.
तसेच उलटी मधून रक्त पडत असेल, घोळणा फुटला असेल, मूळव्याधीतून रक्तस्राव,शौचावाटे रक्तस्त्राव, पायांच्या कुरुपा मधून रक्तस्राव होत असेल, वास घेण्याची क्षमता नष्ट झाली असेल ,दात वाकडे तिकडे येणे, अर्धवट तुटणे, सतत तोंड येणे, लहान मुलांची शारीरिक वाढ खुंटणे. मूडदुस होणे असे त्रास किंवा लक्षणे असतील तर ’क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात दिल्याने चांगला गुण येतो. गर्भारपणात नऊ महिने ’क’ गटाची जीवनसत्त्वे आणि अस्कॉर्बिक असिड दिल्यास बाळामध्ये कुठल्याही प्रकारची जन्मजात व्यंगे निर्माण होत नाहीत.
क जीवनसत्व युक्त पदार्थ : शेंगातील कोवळी तूर, मका, वाटाणा, हरभरा ,सुके खोबरे, खोबर्याचा रस ,दूध पावडर गाईचे, गाईच्या दुधाचा खवा, भाज्यांमध्ये कारले ,कोबी ,गवार, गाजराची पान, हिरवा, टोमॅटो ,पालक, पार्सली, फ्लॉवर, चंदनबटवा ,बटाटा ,भेंडी, मुळा, सर्व क जीवनसत्त्वयुक्त फळे संत्री ,स्ट्रॉबेरी, सीताफळ, लिची, लिंबू ,रासबेरी ,पेरू ,पिकलेली पपई, डाळिंब, खरबूज ,पिकलेला आंबा, अननस.
जान्हवी अक्कलकोटकर, आहारतज्ज्ञ