रिपाई कार्यकर्ते भोंग्यांना संरक्षण देतील; आठवलेंच राज ठाकरेंना आव्हान

मुंबई : अजान म्हणा किंवा भोंगा म्हणा. खरतर राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत केलेल्याा एका वक्तव्यानं राज्याचं राजकारण चांगलच ढवळून निघालं आहे. काल भाजपचे राणा दांपत्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाच्या निर्णयानंतर तर चांगलंच तणावाचं वातावरण पहायला मिळालं. राणा दांपत्यांची पोलिसांनी केलेली अडवणूक, शिवसैनिकांनी केलेला हल्ला अन् किरीट सोमय्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर सामान्य नागरिकांना हे खरंच लोकप्रतिनीधी आहेत का, असा प्रश्व पडला असावा.
अशातच आरपीआईचे रामदास आठवले यांनीही याप्रकरणात उडी घेत थेट राज ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. रामदास आठवले म्हणाले की, अजानला विरोध करणे चुकीचे आहे. अजान काही मिनिटांची असते. त्यामुळे कोणाला त्रास होत नाही.
तसेच रिपाईंचे कार्यकर्ते 3 मे रोजी ठिकठिकाणी मशिदीवरच्या भोंग्यांना संरक्षण देतील. ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी देऊ नका, अशीही मागणी आठवले यांनी यावेळेस केली आहे.
दरम्यान मनसेकडून मशिदीवरील सर्व भोंगे काढून टाकण्यासाठी ३ मे या दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात यादिवशी काही अघटीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडूनही तयारी करण्यात येत आहे. अजान, भोंगा अन् आरोप प्रत्यारोपांच्या या फैरीत मात्र सामान्य नागरिकांच्या प्रश्नांच काय, असा संतप्त सवालही आता नागरिकांकडून विचारला जात आहे.