“राज ठाकरे शिवद्रोही, त्यांनी शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागावी…”

मुंंबई : पुरंदरेच जेम्स लेनचा खरा ब्रेन होते. राज ठाकरे त्यांचं नेहमीच समर्थन करत असतात हे आक्षेपार्ह आहे. राज ठाकरेदेखील या बदनामी कटात सहभागी आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी, अशी मागणी डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आता केली आहे.
कोकाटे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या विवाहात शहाजी महाराज गैरहजर होते असे दाखवले आहे. महाराजांचा महाराणी सईबाई यांच्यासोबत विवाह पुणे मुख्यमंत्री झाल्याचे पुरंदरे सांगतात. पण शिवाजी महाराजांचा महाराणी सईबाई यांच्यासोबत विवाह विजापूर मुक्कामी १६४० मध्ये झाला होता.
खुद्द आदिलशहाने विवाहसमारंभाला येऊन शुभेच्छा दिल्याचा पुरावा निंबाळकर दप्तरात सापडतो. तरीदेखील शहाजीराजांनी गैरहजर दाखवण्यासाठी पुरंदरे यांनी हे लग्न पुणे मुक्कामी झाले असे दाखवले आहे. इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांच्या शिवछत्रपती एक अभ्यास या ग्रंथात हा उल्लेख आहे, असंही कोकाटे यावेळेस बोलताना म्हणाले.
बंगळुरूमधून शिवाजीराजे १६४२ मध्ये खेड शिवापूर इथे आले. त्यानंतर ते १६४५ ला पुण्यात गेले. पण पुरंदरेनी जाणीवपूर्वक शहाजीराजांना गैरहजर दाखवण्यासाठी त्यांनी ते लग्न पुणे मुक्कामी झाल्याचं इतिहासात नमूद केल्याचा आरोप कोकाटे यांनी पुरंदरेंवर यावेळेस लगावलाा.