देश - विदेशरणधुमाळी

भाजप खासदाराचा योगी सरकारवरच नाही विश्वास; म्हणाले…

लखनऊ : भाजपमधील काही नेते वादग्रस्त वक्तव्यांमुळं सातत्यानं चर्चेत येत असतात. त्यातील एक नाव उत्तर प्रदेशातील उन्नव लोकसभा मतदारसंघाचे खासदार साक्षी महाराज. त्यातच आता त्यांनी एक वादग्रस्त फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, आपल्या गल्ली या घरावर जर आचानक मोठा जमाव आला तर त्यातुन वाचण्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहेत? असा प्रश्न करत पुढे ते म्हणाले, जर काहीच नसेल तर अशा पाहुण्यांसाठी कोल्ड्रिंक्सच्या एक किंवा दोन पेट्या आणि धनुष्यबाण घरात ठेवा. पोलिसांच्या विश्वासावर बसु नका. ते पोलिस भित्रे आहेत, कुठे गल्ली बोळीत लपुन बसतील आणि सर्व शांत झाल्यास गुन्हे दाखल करायला येतील अशी वादग्रस्त पोस्ट साक्षी महाराज यांनी केली.

साक्षी महाराज त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीचं चर्चेत असतात. साक्षी महाराजांनी केलेल्या नव्या फेसबुक पोस्टमुळं चर्चेला सुरुवात झाली आहे. साक्षी महाराजांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पोलिसांवर टीका केली आहे. कोणत्याही समुदायाचं थेटपणे नाव घेणं त्यांनी टाळलं आहे. काही दिवसानंतर प्रकरण चौकशी समितीसमोर जाईल आणि संपेल, असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.घरी येणाऱ्या अशा पाहुण्यांसाठी कोल्ड्रिंक्सच्या एक किंवा दोन पेट्या आणि धनुष्यबाण घरात असावा, असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. साक्षी महाराज यांनी बांग्लादेशमधील एक फोटो देखील ट्विट केला आहे. त्यामधून त्यांचा रोख नेमका कुठं आहे हे समोर येतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये