क्रीडा

भारत-द. आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय क्रिकेट टीम आयपीएलच्या १५ व्या सीझननंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयनं शनिवारी या टी-२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या मालिकेची सुरुवात ९ जूनला दिल्लीमध्ये होणार आहे. आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडियाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असेल.

टी-२० सामन्यांचे वेळापत्रक

पहिला टी-२० सामना
नवी दिल्ली – ९ जून

दुसरा टी-२०
कटक – १२ जून

तिसरा टी-२०
विशाखापट्टणम – १४ जून

चौथा टी-२०
राजकोट – १७ जून

पाचवा टी-२०
बंगळुरू – १९ जून

आयपीएल स्पर्धेच्या १५ व्या सीझनची फायनल २९ मे रोजी होणार आहे, तर ५ सामन्यांच्या मालिकेची सुरुवात ९ जून रोजी नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरू इथं या मालिकेतील सामने होतील.

ऑस्ट्रेलियात यावर्षी होणार्‍या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. मागील वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय टीम सेमी फायनलमध्येही पोहोचू शकली नव्हती. त्या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन झाला. या सिरिजमध्येही तोच कॅप्टन असण्याची शक्यता आहे.+

रोहित शर्माचा फॉर्म आयपीएल स्पर्धेत हरपला आहे. तसेच त्याच्या कॅप्टन्सीमध्ये खेळणारी मुंबई इंडियन्सची टीम पहिल्या सात सामन्यांमध्ये पराभूत झाली आहे. पण, टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून रोहितचा भक्कम रेकॉर्ड आहे. पूर्णवेळ कॅप्टन झाल्यापासून रोहितने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिका जिंकली आहे. आगामी टी-२० वर्ल्डकपच्या तयारीचा भाग म्हणून या मालिकेत हार्दिक पंड्या, टी. नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांच्या पुनरागमनाची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये