राष्ट्रसंचार कनेक्ट

शहरातील १९ केंद्रांवर होणार आज लसीकरण

प्रिकॉशन डोसही दिला जाणार आहे

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू असून, तीन लसींद्वारे ही मोहीम राबवली जात आहे. तसेच १२ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करणे सध्या सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज (दि. २५) लसीकरण सुरू असून, शहरातील १९ केंद्रांवर हे लसीकरण केले जाणार आहे.

उपलब्ध लसीच्या साठ्यानुसार १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कॉर्बेवॅक्स (Corbevax) लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाईल. १४ वर्षे आणि त्यापुढील सर्वांना कोवॅक्सिन, तसेच १८ वर्षे आणि त्यापुढील सर्वांना कोविशिल्ड लसीचा पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. फ्रंटलाइन वर्कर, ६० वर्षांपुढील लाभार्थी यांचेही लसीकरण सुरू आहे.
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल आकुर्डी, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, किवळे दवाखाना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जुने तालेरा रुग्णालय चिंचवड येथे लसीकरण होणार आहे.

सेक्टर नंबर २९ आठवडी बाजरी शेजारी रावेत, पिंपरी चिंचवड महापालिका शाळा जाधववाडी, नवीन थेरगाव रुग्णालय थेरगाव, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, नवीन भोसरी रुग्णालय, स्व. अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, तळवडे समाजमंदिर शाळा, यमुनानगर रुग्णालय, म्हेत्रेवस्ती दवाखाना, नवीन जिजामाता रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा, निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर पिंपरी या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांनाही लस
– कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर पिंपरी, नवीन थेरगाव रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, यमुनानगर दवाखाना, नवीन जिजामाता रुग्णालय, अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा येथे स्तनदा माता, गरोदर महिलांना लसीकरण होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये