मनोरंजन

कॅामेडियन भारती सिंहने केलं ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचं कौतुक; म्हणाली…

मुंबई : लवकरच विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसंच चंद्रमुखी या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तरी आत्तापासूनच अनेक कलाकार त्याचे कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटावर प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह हिने प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच भारती सिंहचा एक व्हिडीओ चंद्रमुखीच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारती सिंहचे आभार मानले आहेत. तू व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आणि तुझ्या सहकार्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तुझे हे शब्द फार मोलाचे आहे. तुला आणि तुझ्या बाळाला खूप आशीर्वाद, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

भारती सिंहने या व्हिडीओद्वारे चंद्रमुखी चित्रपटाचे तसेच लावणी किंग आशिष पाटील याचे विशेष कौतुक केले आहे. “मला फार आनंद होत आहे की माझा मित्र आशिष पाटील याचे चंद्रमुखी या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याचे आवडते म्यूझिक डायरेक्ट अजय अतुल यांचे हे गाणे आहे. चंद्रमुखी या चित्रपटात त्याने लावणीच्या ज्या अदाकारी केल्या आहेत त्या पाहिल्यानंतर खरंच खूप मस्त वाटलं. ‘बाई गं’ हे गाणं नक्की पाहा. चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.” असं भारती सिंह म्हणाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये