देश - विदेशरणधुमाळी

राज्यांतील उष्णतेची लाट आणि मान्सूनवर मोदींची महत्वाची बैठक

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. तसेच मान्सून देखील काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक होणार आहे. देशातील तापमान झपाट्याने वाढत असून विविध ठिकाणी आगीच्या घटना वाढत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले होते. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बोलताना मोदींनी राज्यांना रुग्णालये, कारखाने आणि सार्वजनिक महत्त्वाच्या इतर इमारतींच्या अग्निसुरक्षा ऑडिटला प्राधान्य देण्यास सांगितले होते. आता मोदी राज्यातील उष्णतेची लाट आणि मान्सूनच्या तयारीची आढावा बैठक घेणार आहेत.

एप्रिलमध्ये देशातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४६-४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली होती. राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रातील विदर्भ या पाच भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. महाराष्ट्रातील विदर्भात तापमानाचा पारा ४६ अंशाच्या पार पोहोचला होता. अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले होते. पण, दोन दिवसांपूर्वी रिमझिम पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला. तसेच दिल्लीत देखील एक दिवसापूर्वी काही भागात गारपीटीसह पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये