ताज्या बातम्यारणधुमाळी
सदावर्तेंची पुन्हा होणार चौकशी; गावदेवी पोलिसांनी पाठवली नोटीस

मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान कायद्याच्या कचाट्यात सापडले होते. आता त्यांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. मुंबईतील गावदेवी पोलिसांनी त्यांना यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. सदावर्ते यांच्यावर पाच गुन्हे दाखल असून मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोला आणि पुणे येथे हे गुन्हे दाखल आहेत.
मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सीआरपीसी कलम 110 अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, गावदेवी पोलिसांकडून विशेष अधिकारनुसार ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसंच सदावर्ते यांच्यावर सध्या पाच गुन्हे दाखल असून मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोला आणि पुणे येथे हे गुन्हे दाखल आहेत.