आता घराणेशाही नाही ! काँग्रेसकडून ‘एक परिवार एक तिकीट’ फॉर्मुल्याची घोषणा
![आता घराणेशाही नाही ! काँग्रेसकडून 'एक परिवार एक तिकीट' फॉर्मुल्याची घोषणा congress](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/congress.jpg)
जयपूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर सतत घराणेशाहीचा आरोप केल्या जातो. आता मात्र काँग्रेसने ‘एक परिवार एक तिकीट’ या फॉर्म्युल्याची घोषणा केली आहे. उदयपूरमध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात हे सूत्र अमंलात आणण्याचं ठरल आहे. काँग्रेसचा हा निर्णय पंक्षांतर्गत विरोधकांना आणि घराणेशाहीची टीका करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे काँग्रेसवरील घराणेशाहीच्या आरोपाचा डाग धुतला जाईल अशी अशा आहे.
त्याचबरोबर काँग्रेसने एक सोयीस्कर अपवादही आणला आहे. एखाद्या परिवारातला व्यक्ती जर राजकारणात सक्रिय होत असेल आणि त्याला तिकीट हवं असेल तर त्यानं किमान पाच वर्ष संघटनेत काम केलेलं असलं पाहिजे अशी अट असणार आहे. त्याचबरोबर एक व्यक्तीला एका पदावर केवळ पाच वर्षच राहता येईल अशी सुद्धा व्यवस्था काँग्रेस करणार असल्याची माहिती आहे.