क्राईममहाराष्ट्रशेत -शिवार

दगडफेकीनंतर जालन्यातल्या चांदई गावात संचारबंदी; सरपंचासह १८ जण अटक

जालना : जिल्ह्यातल्या चांदई गावात काल दगडफेक झाली होती. त्यात पाच ते सहा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. तर सात शासकीय वाहनांची जमावाने तोडफोड केली होती. या ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या तीन प्रकरणात 250 जणांवर गुन्हे दाखल केले असून सरपंचासह 18 जणांना अटक करण्यात आलीय. पोलिसांचे सर्च ऑपरेशन अद्याप जारी आहे. संचारबंदी जाहीर केल्यानंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे.

या गावात गुरुवारी दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली होती. गावातील कमानीला नाव देण्यावरुन हा वाद पेटला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. जमावाने केलेल्या दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर पोलिसांची व्हॅन, जीपसह अग्निशमन दलाच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आलीय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये