स्मार्ट उद्योजक

दोन मित्रांनी सुरू केला ऑप्टिकल्सचा व्यवसाय…

हजारो तरुण अनेक वर्षे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. पण जागा कमी निघत असल्यानं मोठ्या प्रमाणात तरुणांची निराशा होते आणि अनेकांना शेवटी कुठंतरी खासगी कंपनीत नोकरी करावी लागते. पण यापेक्षा वेगळा एक प्रवाह आहे जिथं काही तरुण काम करून पैसे साठवतात आणि कमी वयात लहानसा स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. नोकरीच्या मागे लागलेल्या तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यायलाच हवा. केदारनाथ व्हँद्रांव आणि नितीन मोटे त्यांनी एक वर्ष झाले ‘साई ऑप्टिकल्स’ नावाने शॉप सुरू केले आहे. हे शॉप आळंदी रोड, विश्रांतवाडी चौक येथे असून, साई ऑप्टिकल्सची पुण्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

समाधानकारक सेवा आणि चांगली गुणवत्ता पुरवल्याने त्यांच्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणात वृद्धी झाली आहे. सुरुवातीला केदारनाथ यांनी खासगी कंपनीत नोकरी केली. कोरोनाच्या आधी असंच एक ऑप्टिकल्सचं शॉप ओपन केलं होतं, परंतु ते कोरोनाकाळात बंद असल्याने आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आणि ते शॉप पुन्हा सुरू करता आला नाही. मोफत नेत्रतपासणी, अगदी कमी किमतीमध्ये चष्मा बनवून वर्षभराची मोफत सर्व्हिस पुण्यात फक्त साई ऑप्टिकल्सवरच मिळते. त्यामुळे मोठ्या ऑप्टिकल्सलाच भेट देतात. समाजभान म्हणून अनेकवेळा MIC भागात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मोफत नेत्रतपासणीदेखील साई ऑप्टिकल्सच्या माध्यमातून दोन्ही मित्रांनी केली आहे. अजूनही अनेक ठिकाणी स्वतः मोफत नेत्रतपासणीचे कार्यक्रम ते राबवत असतात.

कमी वेळात व्यवसायात एवढी वृद्धी करणं ही नक्कीच कुतूहलाची बाब आहे. मात्र त्यासाठी मोठा संघर्ष दोघांना करावा लागला आहे. किती वेळ फक्त नोकरीची वाट बघणार त्यापेक्षा लवकर काहीतरी करून इन्कम सोर्स निर्माण करणं त्यांना महत्त्वाचं वाटलं. दोन्ही मित्रांनी एकजुटीने काम करत पैसा साठवून व्यवसायात उडी घेतली आणि स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून दिलं आणि आता ते यशाच्या मार्गावर आहेत. तर केदारनाथ सांगतात की, आम्ही आमच्याकडून प्रामाणिकपणे कष्ट केले. ग्राहकांनी विश्वास दाखवला आणि नशिबानेही साथ दिली. त्यामुळेच आम्ही साई ऑप्टिकल्सच्या व्यवसायात वृद्धी करू शकलो. या दोन्ही मित्रांचा व्यावसायिक होण्यापर्यंतचा प्रवास नक्कीच इतर तरुणांना प्रेरणादायक ठरला आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची वाट मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांनी खूप वर्षे बघूच नये, त्यापेक्षा पैसे जमा करून आपला लहानसा व्यवसाय सुरू करणं कधीही सोईचं. कोणताही व्यवसाय करताना त्या व्यवसायाबद्दल आधी अनुभव असणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये