देश - विदेश

अहमदनगर रायफल अँड पिस्तूल शूटिंग क्लबचे यश

अहमदनगर : नाशिक येथे झालेल्या भीष्मराज बाम मेमोरियल राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये अहमदनगर रायफल अँड पिस्तूल शूटिंग रेंजच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्यपदक पटकावले.

यामध्ये अहमदनगर शूटिंग क्लबचे १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात गौरव खेडकर याने सीनियर गटात सुवर्णपदक, कु. मंजू खाडे हिने सीनियर गटात रौप्यपदक, कु. श्रावणी भगत हिने सब यूथ गटात रौप्यपदक, तसेच राज फटांगडे याने सब यूथ गटात कांस्यपदक व रोनक टोकशिया याने ISSF कॅटेगरीमध्ये सीनियर गटात कांस्यपदक व १० मी. ओपन साईट खेळप्रकारात रोहित वाघ याने चांगली कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. वरील सर्व यशस्वी खेळाडूंना अलीम शेख, ऋषिकेश दरंदले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. वरील सर्व यशस्वी खेळाडूंना अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा अधिकारी दीपाली बोडखे, क्रीडा अधिकारी बॅडमिंटन प्रशिक्षक विशाल गर्जे, बाळासाहेब पवार यांनी पुढील स्पर्धेसाठी
शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये