पुण्यात राज ठाकरेंच्या सभेदिवशी शिवसेनेनं केली मोठी खेळी…

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण गरम केलं आहे. राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि अयोध्येचा दौरा चर्चिला जात आहे. राज यांच्याकडून सध्या अयोध्येचा दौरा स्थगित करण्यात आला आहे. मात्र त्याआधी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. सध्या ठाकरेंच्या सभेची मनसेकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. त्यातच सेनेने मोठा धक्का देण्यासाठी कंबर कसली आहे. कारण राज ठाकरे यांच्या सभेदिवशीच मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, आधी नदी पात्रात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, पावसाच्या कारणास्तव सभा गणेश कला क्रीडा मंचच्या सभागृहात होणार आहे. त्या आधीच मनसेला गळती लागायला सुरुवात झाली आहे. त्यातच शिवसेनेने संधी साधत मनसेचे बडे नेते फोडल्यानं सभे आधीच पुण्यात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत सेनेच्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. यातून राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेला मोठा धक्का देण्याची खेळी शिवसेनेनं खेळल्याचं कळतंय.