देश - विदेश
बिहार आणि आसाममध्ये अस्मानी संकट; लाखोंचे जीव धोक्यात

शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळून बिहारमधल्या 16 जिल्ह्यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आलेले पूर आणि भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 14 वर पोहोचली असून, सुमारे 7.12 लाख लोक बाधित झाले आहेत.
बिहारमधील घटनेनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. बिहारमधील या आस्मानी संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खेद व्यक्त केला आहे अंडी मदतीचे आश्वासन दिले आहे.
नितीशकुमार यांनी ट्वीट करत सावध राहण्याचे “घरी रहा आणि सुरक्षित रहा,” असे म्हणत नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सूचीबद्ध केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.