महाराष्ट्ररणधुमाळी

शिवसेनेनं केला संभाजीराजेंचा पत्ता कट? संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

कोल्हापुर : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. सहाव्या जागेसाठी आपल्या भूमिकेवर शिवसेना ठाम असून, छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेनं उमेदवारीसाठी पक्ष प्रवेशाची अट घातली आहे. त्यानंतर संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर धुडकाऊन लावली. आता मात्र शिवसेनेकडून संभाजीराजेंचा पत्ता कट करुन, राज्यसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. शिवसेनेनं कोल्हापुरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावासमोर शिक्कामोर्तब केला आहे. थोड्याच वेळात या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या ऑफरकडं संभाजीराजेंनी पाठ फिरवली होती. पण आता कोल्हापुरातल्या शिवसेना नेत्याचा विचार केला जात असल्यानं संभाजीराजेंनी लवकर निर्णय घ्यावा लागणार असल्याचं बोललं जात आहे. यातच संभाजीराजेंनी उमेदवारी फेटाळल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना नेत्यांनाच उमेदवारी देण्यावर ठाम आहेत. शिवेसनेनं संभाजीराजेंना निर्णय घेण्यासाठी वेळ दिला होता. यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये