देश - विदेश

मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीतही गोची?, धनंजय मुंडेंचा सुप्रिया सुळेंच्या सुरात सूर!

सातारा – Dhananjay Mude on CM | भाजप (BJP) आणि शिवसेनेची (Shivsena) युती ही मुख्यमंत्रिपदावरून तुटली होती मात्र आता महाविकास आघाडीतही राष्ट्रवादी पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केली जात आहेत. खासदार सुप्रिया सुळे (MLA Supriya Sule) यांनी याआधी मुख्यमंत्रिपदाबाबत अंबाबाईच्या मंदिराच (Temple of Ambabai) नवस केला आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Mude on CM) यांनीही वक्तव्य केलं आहे.

राज्यात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. साताऱ्यातील (Satara) एका सभेमध्ये ते बोलत होते. शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी शिवेसेनेच्या आमदारावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असलो तरी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचं थोरात म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये