‘ही’ बोल्ड सीरिज एकांतात पाहण्यासाठी अनेकजण घेतात Netflix चं सब्सक्रिप्शन
मुंबई | Netflix Bold Series – आजवर ‘Netflix’ वर बऱ्याच वेब सिरीज प्रदर्शित झाल्या आहेत. यातील काही वेब सीरिज या कलाकारांच्या अभिनयासाठी तर काही कथानकांमुळे गाजल्या आहेत. तसंच काही सीरिज या त्यांच्या सिनेमॅटोग्राफीसाठीही चर्चेत आल्या आहेत. यामध्ये अशी एक सीरिज आहे जी यातील काही निकषांसोबतच आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे.
बरेच बोल्ड सीन असणाऱ्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्धीकी, सैफ अली खान आणि अशा इतरही कलाकारांच्या भूमिका होत्या. तसंच या सीरिजचं नाव आहे ‘सेक्रेड गेम्स’. आत्तापर्यंत नेटफ्लिक्सवर बऱ्याच भाषांमधील सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. मात्र सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्स हिंदीवर आलेल्या सीरिजनं प्रेक्षकांना एकाच जागी खिळवून ठेवलं.
सेक्रेड गेम्स या सीरिजमध्ये अभिनेत्री राजश्री देशपांडे आणि नवाजुद्दीन सिद्धीकी यांचे अनेक बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. या सीनमुळे प्रत्येक वेळी ही सीरिज पाहताना घरात आपल्या शेजारी मोठं कोणी नाही ना याची काळजी अनेकजण घेताना दिसतात. सेक्रेड गेम्स या सीरिजचा २०१८ मध्ये पहीला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यानंतर या सीरिजच्या दुसऱ्या भागाकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा वळल्या. तसंच या सीरिजचं कथानक विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवर आधारलेलं आहे.