देश - विदेशरणधुमाळी

एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या ‘या’ आमदाराला हृदयविकाराचा झटका!

सुरत : सोमवारी विधानपरिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. ते शिवसेनेच्या 12 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुजरातला गेले आहेत. त्यामुळे राज्यभर राजकीय नाट्याने जोर धरला असून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. याअगोदर त्यांच्या पत्नीने ते हरवले असल्याची तक्रार केली आहे. त्यांनी काल फोन करून अकोल्यातील घरी परत येणार असल्याचं सांगितलं होतं पण ते आले नाहीत म्हणून ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पाच आमदारांचा विजय झाला आहे. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराच्या पराभवानंतर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत सुरत गाठलं आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार असल्याचं बोललं जातंय. तसंच त्यांच्यासोबत असलेले आमदार नितीन देशमुखांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे.

दरम्यान, सध्या राजकीय वातावरण तणावाचे झाले असून राज्यातील सरकारचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे भाजपला जाऊन मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेच फुट पडल्याचं चित्र उभं राहिलं आहे. तर मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये