मान जाओ ना…
गाण्याची सुरुवात खट्याळ, खेळकरपणाने. एस. डी. बर्मन यांच्या अप्रतिम सुरावटींनी. त्यानंतर ऐकू येतात ते आशा भोसले आणि मोहम्मद रफीचे ताजेतवाने आवाज.
चित्रपट कालापानी. मजरूह सुलतान पुरींचे मखमली शब्द. एस.डी. बर्मन यांचे अप्रतिम संगीत. गाणं ज्यांच्यावर चित्रित झालं ते देव आनंद आणि मधुबाला म्हणजे साखरभात सुधारस पाकाबरोबर खाण्यातला प्रकार. किती ते गोड असावं. किती नाजूक आणि हवहवसं. मागच्या भागातलं गाणं ज्या लटक्या रागावर होतं, रुसव्यावर होतं, तसंच हे एक गाणं. इथंही नाही का; मी हरले. पराभव झाला माझा. तू जिंकलास. आता मी जे म्हणते ते ऐक सोड हा राग आणि जे क्षण आपल्याला एकमेकांच्या सहवासात घालवायला मिळतात ते अगदी आनंदात, प्रेमाने, समाधानात घालवूया असं सांगणारं गाणं. या गाण्याचा शेवटही असाच गोड. पण त्या शेवटच्या पूर्वी दोघांनी एकमेकांना केलेली प्रश्नोत्तरं आणि त्या प्रश्नोत्तरातून राग व्यक्त केला तरी तो किती खोटा आणि नखरा किती मोठा हे जाणवतं.
गाण्याची सुरुवात खट्याळ, खेळकरपणाने. एस. डी. बर्मन यांच्या अप्रतिम सुरावटींनी. त्यानंतर ऐकू येतात ते आशा भोसले आणि मोहम्मद रफीचे ताजेतवाने आवाज. वाचिक अभिनय म्हणजे काय, आणि तो किती काळजापासून करायचा याचं हे गाणं म्हणजे उत्तम उदाहरण. एकदा का हे गाणं पाहिलं की मधुबालाचं नाक उडवलं डोळे, मिचकावणे आणि मिश्कील हसणं आपल्या डोळ्यासमोर येतं. देवानंद चालता, चालता, धडपडतो आणि प्रेमाने तिच्या विनंतीचा स्वीकार करतो हेसुद्धा ऐकून आपल्या डोळ्यासमोर येत रहातं. या गाण्यामध्ये ‘समझे’ हा शब्द खूप सुंदर छटा घेऊन येतो. देवानंद आणि मधुबाला दोघंही एकमेकांना समझे असं प्रेमाने दटावत. आत या दटावण्यात प्रेमळ धाक आहे. हा धाक जे धमकावत, ते तसं करणार नाही याचा विश्वास आहे.
अप्रतिम अशी तीन कडवी. खरं तर यातील कडव्यांमध्ये असलेले सवाल-जबाब अर्थात प्रश्नोत्तरं गोड दम देण्याची भाषा एक सुंदर मेलडी तयार करते. प्रेमामध्ये लहानसहान बाबी सोडून द्यायच्या असतात.
आता तू रागावला आहेस तर मी माफी मागतो आणि सोडून दे सगळं. असं मधुबाला देवला सांगते. तो म्हणतो मला त्रास देऊ नको. मी नाही तूच रागावली आहेस. आपण एकमेकांचा हात धरून वाटचाल केली पाहिजे. हात सोडलास तर तुलाच हात चोळत बसावं लागेल. त्यावर तो समजले नाही असं सहज म्हणून जातो. तेही अप्रतिम. एकटा राहिलास तर काय करशील? तिथं तो सांगतो की जमेल तसं आयुष्य काढीन. खाचखळग्यांमध्ये. ती म्हणते माझा हात सोडून चालायचा प्रयत्न केल्यास तर चार पावले ही चालू शकणार नाहीस. मी तुला सोडून दिले तुला तर काय करायचं? देवानंद खूप सुंदर उत्तर देतो. सुखात रहा. कोणाची तरी हो. त्यावर मधुबाला म्हणते, हे बघ मी राहिलीच नाही तर आठवण कोणाची काढशील आणि त्यावर समजलं का असा विचारल्यावर समेट होऊन देव समजलं असं सांगतो. अत्यंत अप्रतिम संगीत, साधे सोपे शब्द. एकमेकांशी लटक्या रागाने केलेलं भांडण या सगळ्याचा उत्तम नमुना!
मधुसूदन पतकी