“तुम्ही मला तोतऱ्या म्हणा नाहीतर भो**, पण मी स्वस्थ बसणार नाही” किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
!["तुम्ही मला तोतऱ्या म्हणा नाहीतर भो**, पण मी स्वस्थ बसणार नाही" किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा kirit somaiya](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/kirit-somaiya-780x470.jpg)
मुंबई- Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील पराकोटीला जात असलेला राजकीय गदारोळ पाहून देशभरातून राजकीय नेत्यांच्या आणि विश्लेषकांच्या क्रिया प्रतिक्रिया सुरु आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका करत आहे. विरोधी पक्षांना शिवसेनेत पडलेली फुट ही टीका करण्यासाठी चांगलीच संधी सापडलेली आहे. मात्र अजूनही विरोधी पक्षातील मोठे नेते शांत दिसत असले तरी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील गोंधळानंतर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष केलं आहे.
“सध्याच्या परिस्थितीला बघून राज्यातील माफियाराज सरकारचा शेवट जवळ आला आहे. हे माफिया सरकार, मुख्यमंत्री आणी त्त्यांचे प्रवक्ते आम्हाला धमक्या देत आहेत. मी त्यांना निरोप देऊ इच्छितो, ठाकरे साहेब तुम्ही मला तोतरा, बोबड्या नाहीतर टमरेल म्हणा. प्रवक्ते संजय राऊत आम्हाला भ** म्हणतील, चु** म्हणतील. पण तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल. उद्धव ठाकरे साहेबांकडून मी १९ बंगल्यांचा हिशोब घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.” असा थेट इशारा किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
“महाराष्ट्रातल्या माफिया सरकारचा अंत जवळ आलेला आहे. मुंबई महापालिकेचं माफियाराज मुंबईकर लवकरच संपवणार आहे.” असंही सोमय्या यांनी आगामी महापालिका निवडणुकींना धरून म्हणाले.