शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत?

पुणे – शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त ‘सामना’मध्ये आलं. मात्र त्यानंतर शिवसेनेने शुद्धीपत्रक काढून आढळराव पाटील हे कार्यरत राहणार असल्याचं सांगितलं. मात्र यामुळे आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सूचक वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादीविरुद्ध लढतो त्याचीच शिक्षा बहुधा मला मिळाली असावी. मी अस्वस्थ आहे. काय बोलावं ते कळत नाही. एक दोन दिवस विचार करेन आणि पुढचं काय ते ठरवेन, असं म्हणत आढळराव पाटील यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
दरम्यान, सकाळपासून मला अनेकांचे फोन आले, मला पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगितलं. मात्र मला मस्करी वाटली परंतू सामनामधील बातमी पाहून धक्का बसला. कारण माझं शनिवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं असल्याचं पाटील यांनी सांगितलं.