ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

संपवून दाखवलं!’ भाजप आमदाराचं शिवसेनेच्या जिव्हारी लागणारं टीकास्त्र!

मुंबई : (Ram Kadam On Shivsena) दोन दिवसांपुर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरेंचा उल्लेख माफिया उद्धव सरकार गेलं असा केला होता. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. किरीट सोमय्या उद्धवजींबाबत जे बोलले ते चुकीचं असल्याचं केसरकर म्हणाले.

दरम्यान, ज्या पक्षात आम्ही घडलो, त्या पक्षप्रमुखांना भाजपनं नाव ठेवू नये व यापुढे असं वक्तव्य करु नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला होता. त्याबद्दल आम्ही ताबडतोब फडणवीसांना सांगितलं आहे. फडणवीस याबाबत निर्णय घेतील आणि यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही, असा दावा दीपक केसरकर यांनी केला होता.

मात्र, भाजपमधील शिवसेनेचे कडवे विरोधक मानले जाणारे अनेक आमदार शिवसेनेवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. मुंबईतील भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला आहे. राम कदम यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. यामध्ये ‘संपवून दाखवलं!’ असा मजकूर लिहला आहे. राम कदम यांच्या या वक्तव्याचा रोख शिवसेनेच्या दिशेने असल्याचे दिसत आहे. यावर आता शिवसेना काय प्रत्युत्तर देणार आणि शिंदे गट याला कशाप्रकारे घेणार हे पहावं लागणार आहे. शिवाय यामुळं शिंदे गट आणि भाजप यांच्यात आत्तापासूनच वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये