पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

विद्यार्थ्यांचा पालखी आणि वृक्ष दिंंडी सोहळा

कात्रज : आंबेगाव बु.येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्राथमिक ते ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी दिंडी सोहळा उत्साहात साजरा केला. फुलांनी सजविलेली माऊलींची पालखी, विद्यार्थी वारकरी पारंपरिक पोशाखात होते. संगीत विभागाच्या साई कामठे व कोरस यांच्यासह विद्यार्थ्यांनी कानडा राजा पंढरीचा, माझे माहेर पंढरी, अबीर गुलाल, हेची दान देगा देवा अभंग सादर केले. अभंगाच्या स्वरांनी विद्यार्थी, शिक्षक व पालक तल्लीन होऊन मंत्रमुग्ध होऊन गेले.

विद्यार्थ्यांनी अखंड विठूनामाचा गजर करत शाळेचा परिसर दुमदुमून टाकली. शाळेच्या वतीने दरवर्षी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. संस्थापक राजीव जगताप हस्ते आरती करून पालखी दिंडीला सुरुवात झाली. याबरोबरच ज्युनिअर काँलेज एन.एस.एस विभागामार्फत आयोजित वृक्षदिंंडीने सोहळ्याची शान वाढविली. दिंंडीची सुरुवात प्राचार्य वर्षा शर्मा यांच्या हस्ते झाली.काँलेज परिसरात वृक्षदिंडी काढत कोरोनाच्या काळात आँक्सिजन किती महत्त्वाचे आहे यांची जाणीव यानिमित्ताने करुन दिली. वृक्ष संवर्धनाचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून दिला.पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये