वेण्णा तलाव ओसंडून वाहू लागला

महाबळेश्वरमधील रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. धरणात अडीच दिवसात ५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात अडीच टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सध्या २५.६० टीएमसी पाणी साठा झाला आहे. गेल्या चोवीस तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ७६ मिलीमीटर, नवजा येथे ८९ मिमी, तर महाबळेश्वर १३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सातारा : महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वाधिक कॉर्डब्रेक पाऊस झाल्यामुळे शहराची जीवनदायिनी असलेला वेण्णा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे महाबळेश्वरच्या नागरिकांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. संपूर्ण राज्यातच मग त्यात कोकण,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ
भागात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मात्र सर्वाधिक कॉर्ड ब्रेक पाऊस हा महाबळेश्वर आणि कोयना धरण क्षेत्र परिसरात झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तमाम महाबळेश्वर – पांचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे. शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले याच वेण्णालेक मधून महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोसळणार्या पावसाने महाबळेश्वरची जीवनदायिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. शनिवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत १३५५.४० मि. मी ५३ इंच पावसाची नोंद झाली तर, २४ तासात १५० मि.मी (५ इंच) पावसाची नोंद करण्यात आली.