आरोग्यफिचरबॅक टू नेचर

मेंदूला का समजून घ्यावे?

अशोक सोनवणे | सायकोलॉजिस्ट तथा ब्रेन प्रोग्रामिंग ट्रेनर |

निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल देणगी म्हणजेच मानवी मेंदू ही होय. सजीवामधील सर्वात गुंतागुंतीचा अवयव म्हणून मानवी मेंदूकडे पाहिले जाते. जगात कितीही संशोधने पुढे गेली असली तरी अजूनही मेंदू आणि मेंदूची कार्यपद्धती याबाबत फक्त २५ ते ३५ टक्के माहिती जगासमोर आलेली आहे. मेंदूच्या अफाट शक्तीमुळे जगातील सर्वात जास्त रहस्यमयी म्हणून मेंदूकडे पाहिले जाते. मेंदू आणि मन याला वेगळे करता येत नाही.

मेंदू हा विशाल ब्रम्हांडाप्रमाणे असून मन हे ब्रम्हांडातील एका घटकाप्रमाणे आहे. मनाचेही अंतर्मन आणि बाह्यमन असे दोन प्रकार पडतात. मनाचीच शक्ती अफाट आहे. मग पूर्ण मेंदूची किती असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. “आपले विचार, विचारातून निर्माण होणाऱ्या भावना, मेंदूतील संवेदना ग्रहण करणारी आणि संवेदनांना प्रतिसाद देणारी केंद्रे, विविध मानसिक अवस्थेमधून स्त्रावणारी रसायने, या रसायनांचा परिणाम म्हणून आपल्या विचार, भावना, स्वभाव आणि व्यक्तिमत्वावर पडणारा परिणाम म्हणजेच मन होय.”

मित्रहो आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला, प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक पेशीला चालविण्याचे काम मेंदू करीत असतो. तसेच आपले विचार, भावना, गुण-दोष, आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता, आपली बुद्धीमत्ता, मानसिक किंवा बौद्धिक कौशल्य हे सर्व मेंदूमध्येच निर्माण होत असते. त्यामुळे आपल्याला मेंदुविषयी पूर्ण ज्ञान असलेच पाहिजे. आपले नातेसंबंध, आपल्यातील समजदारी, संघर्ष, विश्वास आणि सहनशीलता हे सुद्धा आपल्या मेंदूतील रसायनावर अवलंबून असते. आपल्या मेंदूतून कोणत्या मानसिक अवस्थेत कोणती रसायने स्त्रावतात. कोणती रसायने पॉझिटिव्ह असतात तर कोणती निगेटिव्ह असतात. हे माहिती असणे आवशक आहे. इतकेच नव्हे तर आपल्यातील नैराश्य, उदासीनता, चिडचिडेपणा, आक्रमकता, घाबरटपणा, खोटारडेपणा किंवा यासारख्या अनेक विकृती सुद्धा मेंदूमधून स्त्रावणाऱ्या रसायनावर अवलंबून असते.

कोणत्या रसायनांचा परिणाम म्हणून हा व्यक्ती असा वागतो हे पाहणे महत्वाचे ठरते. आपण आपला किंवा आपल्या मुलांचा चांगला शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा याकरिता, त्याचे चांगले आरोग्य आणि चांगली बुद्धिमत्ता याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतो. त्याकरिता चांगली शाळा, क्लास, आहार, मैदान, व्यायाम, चांगली वैद्यकीय सुविधा अशा अनेक गोष्टीकडे लक्ष देतो. परंतु हे तर सर्व मेंदुमध्येच निर्माण होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये