आरोग्यताज्या बातम्या

“कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात”; लसीसंदर्भात तीन वर्षांनंतर कंपनीचा धक्कादायक खुलासा!

Covishield Covid Vaccine : कोविशिल्ड कोरोना लस घेतलेल्यांसाठी अतिशय चिंताजनक बातमी समोर आली आहे. कोविशिल्ड लसीचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, हे कंपनीने मान्य केलं आहे. अनेकदा असे आरोप करण्यात आले होते. पण आता कंपनीच्या कबुलीमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. कोविड लसीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या दावा धोक्याची घंटा आहे.

नामांकित वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅस्ट्राझेनेकाने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होत असल्याचा दावा ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने केला होता. तसेच त्याने अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीविरोधात तेथील न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

या याचिकेवर उत्तर देताना कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविराकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिली. मात्र हे दुष्पपरिणाम क्वचितच आढळू शकतात, त्यामुळे नागरिकांना घाबरू नये, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये