सुनेचं जडलं सासूवर प्रेम! मोबाईलवर आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून शरीर संबंधांची मागणी!
उत्तर प्रदेश | आपण अनेकदा पाहतो लग्नानंतर सासू-सुनेमध्ये खटके उडतात. यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. अशा घटना आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात. परंतु उत्तर प्रदेशात काही वेगळीच घटना घडली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. सुनेचं चक्क सासूवर प्रेम जडलं, इतकंच नाही शरीरसुखासाठी सुनेकडे सासूवर दबाव टाकण्यात येत असल्याची घटना समोर आली आहे.
सासूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुनेला सासूशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, त्यासाठी ती जबरदस्तीने मोबाईलवर आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवते. सासूने सुनेच्या विरोधात एसएसपी कार्यालय जाऊन तक्रारही दाखल केली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये ही घटना समोर आली आहे.
सुरुवात कशी झाली
सासू आणि सून यांचं नातं हे आई आणि मुलीसारखे असते, पण बुलंदशहरमध्ये एका सूनचे तिच्या सासूवर इतकं अतोनात प्रेम जडलं आहे की, आता तिला तिच्या पतीला घटस्फोट देऊन तिच्या सासूसोबत राहते. सून तिच्या सासूवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकते. सुनेच्या या कृत्याने त्रस्त झालेल्या सासूने प्रशासनाकडे मदतीचे आवाहन केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती
उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरामधील या घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सून सासूच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली आहे की, ती आपल्या पतीला सोडून सासूसोबतच आयुष्य घालवण्यास तयार आहे. सून सासूसोबत जगण्या-मरण्याची वचनं घेण्यासही तयार आहे. सून सासूला आपल्या सोबत ठेवून शरीरसुखाची मागणी करते. सून सासूला आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून तस करण्यासाठी दबाव टाकते, अशी माहिती समोर येत आहे. सासूने याविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे.
मोबाईलवर दाखवते आक्षेपार्ह व्हिडीओ
एका महिलेने आपल्या सुनेबद्दल वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे (SSP) तक्रार केली आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितलं आहे की, माझ्या सुनेला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. सासूने सांगितलं की, सून म्हणते की तू तुझ्या मुलापासून आणि पतीपासून वेगळं होऊन माझ्यासोबत ये आपण एकत्र राहू. ती मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून दबाव निर्माण करते आणि शारीरिक सुखाची मागणी करत धमकीही देते, अशी तक्रार या महिलेने केली आहे. पोलिसांनी तक्रार पत्र महिला कक्षाकडे तपासासाठी पाठवलं आहे.
सूनेला पतीपासून विभक्त व्हायचंंय
महिलेने सांगितलं की, सुनेचे मुलाशी लग्न होऊन 2 वर्षे झाली पण आजपर्यंत तिला मूल नाही. सूनेला पतीपासून विभक्त व्हायचं आहे तर, सुनेसह तिचे आई-वडील वेगळे होण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी करत आहेत. पीडित महिलेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या सुनेबद्दल या सर्व गोष्टी सांगत आहे. पीडित महिलेने दिल्लीहून बुलंदशहर येथील एसएसपी मुख्यालय गाठून तक्रार दाखल केली.
सध्या पोलिसांनी महिलेला तिच्या तक्रार पत्राबाबत तपासासाठी महिला कक्षाकडे पाठवले आहे. या प्रकरणी महिला सेलच्या प्रभारींनी तपास सुरू असून तपासात समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.