शिवसेनेचे खासदार बंडाच्या शेवटच्या टप्प्यात? ‘या’ माहितीवरुन झालं स्पष्ट!

मुंबई : (Shivsena PM Meet On Amit Shaha) काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली वारीत भाजपच्या जेष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, आज समोर आलेल्या माहितीवरुन राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.
दरम्यान, सोमवार दि. ११ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या बैठकीत केवळ १० ते १२ खासदारांचीच उपस्थिती असल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही बंड करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याच्या दिवशीच सेनेच्या तब्बल ११ खासदारांनी देखील अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. अमित शाह आणि या खासदारांची तब्बल साडे पाच तास शहा यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन असं म्हटलं जात आहे खासदार हे बंडाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. हे शिवसेनाभवनात झालेल्या बैठकीत अनेक खासदारांनी दांडी मारल्यानं लक्षात येत आहे.