“आरे आंदोलनात सहभागी झालेले आदित्य ठाकरे बाळ”

मुंबई : (Nitesh Rane On Aditya Thackeray) आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करावा यासाठी रविवारी दि. १० रोजी काही पर्यावरणप्रेमी संस्थांकडून आंदोलन केलं. या आंदोलनात राज्याचे माजी पर्यावरण मंत्री व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाले. अदित्य ठाकरेंनी या आंदोलनाचे फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केले आहेत. त्यांनी ट्विट केलेल्या फोटोत काही लहान मुलांच्या गळ्यात आरे वाचवाच्या पाट्या लावून त्यांना आंदोलनात सहभागी केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, या पार्श्वभुमीवर आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून सुरु असलेल्या आंदोलनाला आता वेगळं वळण लागलं आहे. आंदोलनात लहान मुलांचा वापर झाल्याप्रकरणी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री व युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेने राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार केली आहे.
त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे ट्वीट करत म्हणाले की, बालहक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग अद्याप लहान असलेल्या व्यक्तीला नोटीस कशी पाठवू शकतो! या राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या नोटीसीनंतर बालहक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग अद्याप लहान असलेल्या व्यक्तीला नोटीस कशी पाठवू शकतो! असा अन्याय मान्य नाही. अदित्य ठाकरे हे लहान बाळ आहेत.
सह्याद्री राईट्स या संस्थेने आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिस आणि राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार दाखल केल्यावर बालहक्क आयोगाकडून मुंबई पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली आहे.