दुर्गम पर्यटन : रडकुंडीला आणणारा रडतोंडीचा घाट
![दुर्गम पर्यटन : रडकुंडीला आणणारा रडतोंडीचा घाट radtondi](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/radtondi-780x470.jpg)
भटकंती | श्रीनिवास वारुंजीकर |
शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाक यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात ज्या रडतोंडीच्या (रडकुंडीच्या नव्हे) घाटाचा उल्लेख केला तो घाट महाबळेश्वर-प्रतापगडला जोडतो. शिवरायांच्या काळात होता, तसाच आजही हा घाट दुर्गम प्रकारातच मोडतो. अशा या घाटात पावसाळ्यानंतर अवश्य जावे.
महाबळेश्वरचे घनदाट जंगल आणि मग जावळीमध्ये उतरणारा घसरगुंडीसारखा उतार म्हणजे खरोखरच रडकुंडीला आणणारा रडतोंडीचा घाट होय; हाच तो रडतोंडीचा घाट ज्या मार्गाने अफझलखानाचे सैन्य जावळी-कोयनेच्या खोर्यात दाखल झाले होते. सहसा कोणाच्या चर्चेत नसणा, पण तितकेच ऐतिहासिक महत्त्व असणा असे हे एक ठिकाण आहे.
महाबळेश्वरपासून पोलादपूरकडे जाताना अंबेनळी घाटात मेटतळे नावाचे एक छोटेसे गाव लागते. महाबळेश्वरपासून ५-६ किमी अंतरावर या गावापासून साधारण ३०० मीटर तसेच पुढे गेल्यावर घाटरस्ता उजवीकडे वळतो. या वळणावरच डावीकडील कठडा ओलांडून झाडीतून थोडे पुढे आल्यास आपल्याला एका प्रशस्त रुंद दगडी वाटेचे अवशेष आपल्या नजस पडतात. हीच ती ऐतिहासिक वाट- रडतोंडीचा घाट रुंदीला चांगली ७०-८० फुट रुंद असणारी ही दगडी वाट वळणे वळणे घेत जावळीच्या घनदाट जंगलात उतरते.
अतिशय दाट असे हे जंगल आहे. ऐन उन्हाळ्यात दिवसासुद्धा सूर्याचा प्रकाश इथे जमिनीवर पडणे मुश्कील, असे हे निबिड अरण्य आहे. काही ठिकाणी पायर्यांचे पुरातन अवशेषही आपल्याला दिसतात, तर कोयनेवर दगडी बांधकाम असलेला शिवकालीन पूलही दिसतो.
पार गावाच्या थोडेसे अलीकडे कोयना नदीच्या काठावर अफझलखानाचे सगळे सैन्य मुक्कामी होते. अंदाजाने हा परिसर पाहिला तरी एक गोष्ट लक्षात येते, की या ठिकाणाहून अफझलखान भेटीचे ठिकाण काही केल्या अजिबात दिसत नव्हते. पण प्रतापगडाच्या दक्षिण बुरुजावरून मात्र हा मुक्कामाचा संपूर्ण परिसर दृष्टीस पडतो. म्हणजेच शिवरायांनी भेटीची जागाही अशी काही निवडली होती, की त्यात त्यांचे राजकीय चातुर्य दिसून येत होते.