…म्हणून मी उद्धव ठाकरेंशी बोललो नाही: उदय सामंत
![...म्हणून मी उद्धव ठाकरेंशी बोललो नाही: उदय सामंत Uddhav Thackeray and Uday Samant](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/Uddhav-Thackeray-and-Uday-Samant.jpg)
मुंंबई : (Uday Samant On Shivsena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं असलं तर आम्ही सर्व अधिकार शिंदेंना दिलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेशी बोलावं. ते एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. पुणेकरांच्या वतीने सोमवार दि. 18 जुलै रोजी सायंकाळी मुंबईत अभिनंदन आणि सत्कार करणार आहेत. पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी मला भेटले आहेत.
दरम्यान सावंत म्हणाले, पहिली शिवसेना आणि दुसरी शिवसेना, अशी विभागणी आम्ही केलेली नाही. आम्ही सगळे शिवसैनिक म्हणूनच भेटलो. एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचा स्वागत करणार आहोत असं ते म्हणाले. विरोधक आमच्यात चलबचल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांकडून खच्चीकरण केलं जात असल्याचं भासवलं जात आहे. पण विरोधकांची ही खेळी आहे.
मी गुवाहाटीला गेलो तेंव्हापासून उद्धव ठाकरे यांच्याशी एकदा ही बोललो नाही. कारण माझ्या मनात एक आदरयुक्त भीती आहे. असं राज्यचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत म्हणाले आहेत.