ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना दुहेरी धक्का!

जळगाव : (Shinde Shinde On Eknath Khadse) एकनाथ शिंदेंनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केल्यामुळे ते त्यांच्या ईशाऱ्यावरच नाचणार हे आधीस निश्चित मानले जात होते. भाजप हे पहिल्यापासून सुडाचे राजकारण करणारा पक्ष म्हणून ओळखले जाते. त्यातच आता शिंदे सरकारने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दुहेरी धक्का दिला आहे.

एकीकडे एकनाथ खडसे यांच्या पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी संघाच्या कारभारात मागील काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनाच्या वतीने एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार तसेच दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नागराज पाटील यांनी दूध संघात राबवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासनाकडे गेली होती.

यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी ही मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. दूध संघाच्या कारभारात एकही रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही जर झाला असेल तर दोषींवर कारवाई करावी याची मागणी मी स्वतःच करणार असल्याचेही खडसे यावेळी म्हणाले. संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी तातडीने प्रशासक नियुक्त करणे तसेच चौकशी समिती नियुक्त करणे यात मोठे राजकारण आहे, असे खडसे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये