लाॅन बाॅल आणि टेबल टेनिसमध्ये भारताला ऐतिहासिक ‘सुवर्ण’

बर्मिंगहम – Commonwealth Games : लवली चौबे, रूपा राणी टिर्की, पिंकी आणि नयनमोनी सैकिया यांच्या फोर्स भारतीय महिला संघाने लॉन बॉलमध्ये सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम लढतीत त्यांनी दक्षिण आफ्रिका महिला संघाचा पराभव केला.
भारताच्या लवली चौबे, रूपा राणी टिर्की, पिंकी आणि नयनमोनी सैकिया यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारताला यापूर्वी एकही पदक मिळाले नव्हते. राष्ट्रकुल स्पर्धेतील इतिहासात लॉन बॉलमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे. भारताकडे आता ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्यपदके आहेत.
टेबल टेनिसमध्येही सुवर्ण
स्पर्धेच्या पाचव्या दिवशी मंगळवारी भारताने आणखी एका सुवर्णपदकाची नोंद करताना पुरुष एकेरीच्या टेबल टेनिसमध्ये सिंगापूरला पराभूत केले. भारतीय टेबल टेनिसपटू साथियांशीकरण याने सिंगापूरच्या युव बँक याच्यावर १२-१०, ७-११, ११-७, १२-४ अशी तीन एकने मात केली आणि आणखी एका सुवर्णपदकाची नोंद करत भारताचे टेबल टेनिसमधले वर्चस्व कायम ठेवले.