पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

‘इंडिया टॉपर’ने ‘सूर्यदत्त’मध्ये प्रवेश घेणे अभिमानास्पद

पुणे : इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (आयसीएसई) दहावी परीक्षेत देशात पहिली आलेल्या हरगुन कौर मथारू हिचे सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या वतीने स्वागत करण्यात आले. हरगुन मथारू हिने ‘सूर्यदत्त’मध्ये ११ वीला प्रवेश घेतला आहे. दहावीच्या परीक्षेत ९९.८० टक्के गुण मिळवून मथारूने देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. तिची आई सुखविंदर कौर मथारू बँकर असून, वडील देवसिंग मथारू आयटीमध्ये आहेत.

मथारू हिने ११ वीसाठी ‘सूर्यदत्त’मध्ये प्रवेश घेतल्यानंतर सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, प्राचार्या शैला ओक यांनी तिचे उत्साहात स्वागत केले. स्कार्फ, सुवर्णपदक आणि स्मृतिचिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आला. तिच्या भावी वाटचालीसाठी तिचे व आई-वडिलांचे अभिनंदन करण्यात आले. मथारू हिचे आई-वडील, जनसंपर्कतज्ज्ञ राहुल सिंघवी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये