ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

उद्धव ठाकरेंशी पुन्हा फ्रेंडशीप करणार का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर म्हणाले…

नवी दिल्ली : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) प्रत्येक वर्षीच्या मैत्रीदिनाला अनेक जण शोले चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ या गीताच्या ओळी म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छा देत असतात. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे, आज जागतिक मैत्रीदिन आहे. यानिमित्ताने शिंदे गटातल्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा पाहायला मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

शिंदे गटातील आमदारांनी व्यक्त केलेल्या याच प्रश्नावर पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तुम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंशी मैत्री करणार का? असा थेट सवाल विचारला. या प्रश्नावर गोंधळलेल्या एकनाथ शिंदे यांनी थोडासा पॉज घेत भलतंच उत्तर देऊन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारला असता, त्यावर उत्तर देताना शिंदेंनी चेहऱ्यावर थोडंसं स्मितहास्य आणून, ‘मी या प्रश्नावर काय उत्तर देऊ?’ असा उलट प्रश्न केला करत, पहिल्यांदा तर एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘मैत्रीदिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. म्हणत त्यांनी वेळ मारली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये