संजय राऊतांची लेखणी जेलमध्येही सुरुच माध्यमांशी बोलताना दिली माहिती!
![संजय राऊतांची लेखणी जेलमध्येही सुरुच माध्यमांशी बोलताना दिली माहिती! Sanjay Raut 9](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/Sanjay-Raut-9-780x470.jpg)
मुंबई : (Sanjay Raut On ED Complain) शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गोरेगाव येथिल पात्राचाळ गैरव्यावहार प्रकरणी ईडीने त्यांच्या सध्या कारवाई केली आहे. या प्रकरणाची त्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आज त्यांच्या कोठडीची तारिख संपल्यानं त्यांना न्यायायलात हजर करण्यात आले होते.
दरम्यान, आज पार पडलेल्या न्यायालयीन कारवाईत राऊतांची कोठडी 14 दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळं आता राऊतांचा 5 सप्टेंबर पर्यंत जेलचा मुक्काम वाढला आहे. राऊत हे सामना या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करत होते. ते जेलमध्ये आसल्यानं सामनाचे त्यांचे लिखाण थांपले असले तरी, जेलमध्ये त्यांची लेखणी थांबलेले नाही.
राऊत यांच्याकडून सध्या त्यांच्यावर झालेल्या अनाधिकृतपणे ईडीच्या कारवाईवर पुस्तक लिहीण्यात येत आहे. त्यांना जेलमध्ये वृत्तपत्र, पुस्तके वाचण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे ते वाचून आपले एक पुस्तक देखील लिहीत आहेत. अशी माहिती त्यांनी आज सुनावणी पार पडल्यावर पोलिस कोठडीत घेऊन जाताना माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.