ताज्या बातम्यारणधुमाळी

“सुप्रिया ताईंनी सल्ला देण्यापेक्षा आपल्या घरात कोण किती…”, नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई | Nitesh Rane On Supriya Sule – आम्ही ज्या पद्धतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची सेवा करतो, त्या पद्धतीने कोणताच पक्ष गणेशभक्तांची सेवा करत असेल असं मला वाटत नाही असं वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. त्याचबरोबर रोहित पवारांवरील ईडी कारवाईसंदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

“सुप्रिया ताईंनी सगळ्या बाबतीत सल्लामसलत करण्यापेक्षा आपल्या घरात कोण किती भ्रष्टाचार करतंय यासंदर्भात कधीतरी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, कारण ईडी लहान मुलांची नर्सरी नाही, कुणाला नाही आवडलं तरी चॉकलेट हातात द्यायची. त्यांच्याकडे काही पुरावे आहेत त्यामुळे ते नोटिसा पाठवत असतात. त्यामुळे रोहित पवारांनी बायडेन, रशिया, युक्रेनबद्दल बोलण्यापेक्षा त्यांच्या बुडाखाली किती आग लागली ते पहावं,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर नितेश राणे यांनी पलटवार केला. “त्यांनी आपल्या स्वपक्षाकडे पहावं, आम्हाला सल्ले देऊ नये,” असं राणेंनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये