ताज्या बातम्यारणधुमाळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; म्हणाले, “विघ्नहर्त्याने राज्यावरील बरीचशी विघ्नं…”

मुंबई | CM Eknath Shinde On Oppositions – आज (30 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 3 च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी विरोधकांना खोचक टोले लगावले. “विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. तसंच मेट्रो 3 च्या कामाला शुभेच्छा दिल्या. ते आज कुलाबा-वांद्रे-सिप्स मेट्रो लाइन-3 च्या प्रोटोटाईप ट्रेन चाचणी शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “आज आपण पाहतो आहे की तो संपूर्ण महामार्ग पूर्णत्वास जातोय. आपण लवकरच नागपूर ते शिर्डी या महामार्गाचं उद्घाटन करतो आहे. असे अनेक प्रकल्प सुरू केले. मात्र, त्यात अनेक विघ्नं आली. उद्या विघ्नहर्ता गणरायाचं आगमन होत आहे. अश्विनी भिडेंनी बरोबर योग साधून आज हिरवा झेंडा दाखवला. विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही.”

“प्रदुषण कमी होईल, साडेसहा लाख वाहनांची संख्या कमी होईल, 17 लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील, वेळ वाचेल, साडेतीन लाख लिटर इंधन वापर कमी होईल. याचा खूप मोठा फायदा आहे”, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये